शिरूर (डेली न्यूज पोस्ट -24)शैक्षणिक वर्ष २०२४-२५ एच. एस .सी.बोर्ड परीक्षेत माहिती व तंत्रज्ञान (IT )या विषयांमध्ये चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील कु .सृष्टी लहू आढाव व ऋषिकेश विजय मुंगसे १०० पैकी १०० गुण मिळवून बोर्डात प्रथम आले .
या विद्यार्थ्यांचे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.सी. मोहिते उपप्राचार्य एच.एस. जाधव पर्यवेक्षक ए.एस .वणवे विषय शिक्षिका एस. डी. जाधव ,के.ए.काळे व एस. आर .साळवे यांनी अभिनंदन केले आहे.

