शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}येथील विद्याधाम प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य केंद्र (ग्रामीण रुग्णालय), शिरूर येथे क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. ¸विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज समजावे आणि त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
या क्षेत्रभेटीत २३८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी डॉ. राजेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याची योग्य पद्धत, लसीकरणाचे महत्त्व व फायदे, दैनंदिन जीवनातील आरोग्याचे महत्त्व तसेच आरोग्यविषयक विविध बाबींची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आरोग्य केंद्रातील विविध विभाग व कामकाजाची माहिती जाणून घेतली.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका ज्योती साहेबराव मुळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. तुषार पाटील, डॉ. राजेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
क्षेत्रभेटीच्या आयोजनात इयत्ता दुसरीच्या शिक्षिका सौ. वाघ मॅडम, सौ. गाडे मॅडम, सौ. वाटेकर मॅडम, सौ. कुरडे मॅडम, सौ. घाडगे मॅडम, सौ. पाटकर मॅडम, सौ. चांदगुडे मॅडम आणि सौ. सकट मॅडम यांनी सहभाग घेतला.
पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी व पालक प्रतिनिधींनीही उपक्रमासाठी सहकार्य केले. सौ. वाटेकर अर्चना यांनी सूत्रसंचालन केले, तर सौ. चांदगुडे अपूर्वा यांनी आभार मानले.