Uncategorizedमहाराष्ट्रराजकीय

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना काँग्रेसची आदरांजली; पुतळ्याच्या पुनर्स्थापनेची मागणी

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम  -24}देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टीचे होते. देशाच्या विकासात तसेच भारताची जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण करण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, अशा शब्दांत शिरूर तालुका काँग्रेस आयच्या वतीने इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिरूर शहरातील इंदिरा गांधी यांच्या अर्धपुतळ्याची लवकरात लवकर पुनर्स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शिरूर तालुका काँग्रेस आयच्या वतीने पाबळ फाटा चौकात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश थोरात म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी आपल्या कणखर नेतृत्वातून देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा देशाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठसा उमटला आहे. शिरूर शहरातील क्रांती स्मारक येथे त्यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला होता. मात्र, काही कामानिमित्त हा पुतळा तेथून हलविण्यात आला आहे. या पुतळ्याची योग्य ठिकाणी लवकरात लवकर पुनर्स्थापना व्हावी, यासाठी नगरपालिकेकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग थोरात, जिल्हा उपाध्यक्ष रामदास थोरात, महिला अध्यक्ष सुनीता वाखारे, शहराध्यक्ष अॅड. किरण आंबेकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा सरचिटणीस अजिमभाई सय्यद, शिरूर-हवेली विधानसभा काँग्रेस आयचे अध्यक्ष संतोष गव्हाणे, माजी नगरसेवक मुन्ना उर्फ आबिद शेख, मंदा पवार, त्र्यंबक पवार, आशा जोजाळ, माऊली दरेकर, सुभाष कोळपे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button