विशेष

शिरूरमध्ये भव्य रक्तदान शिबिर; हिमोग्लोबिन व नेत्रतपासणी

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}रक्तदानातून सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी श्री.सकल जैन समाज, शिरूर आणि ॲक्टिव्ह सोशल ग्रुप यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. साध्वी आभाश्री यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित या उपक्रमात रक्तदानासह हिमोग्लोबिन तपासणी आणि मोफत नेत्रतपासणी करण्यात येणार आहे.
याबाबत ची माहिती देताना ॲक्टिव्ह सोशल ग्रुपच्या अध्यक्षा कामिनी प्रकाश बाफना यांनी सांगितले की बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ४ या वेळेत नगरपालिकेसमोरील जैन पंचायत भवन, शिरूर येथे हे शिबिर होणार आहे. या उपक्रमाला साध्वी आभाश्री, डॉ. महिमाश्री, डॉ. श्रेयांसी उपस्थित राहणार आहे.
रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. शिबिरात नागरिकांना मोफत हिमोग्लोबिन तपासणी तसेच नेत्रतपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बाफना यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी आचार्य आनंद ऋषीजी ब्लड बँक, अहिल्यानगर, श्री राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्ट, पुणे, आदिशक्ती महिला मंडळ, आधार छाया फाउंडेशन, वात्सलय सिंधू फाउंडेशन, ॲक्टिव्ह सोशल ग्रुप यांच्यासह विविध संस्था सहकार्य करीत आहेत.
या सामाजिक उपक्रमात शिरूरमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, तसेच मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने कामिनी बाफना यांनी केले आहे.0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button