Uncategorizedराष्ट्रीयविशेष
शिरुर शहरात तिरंगा यात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग भारत माता कि जयच्या जयघोष


शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24 )
समस्त राष्ट्रभक्त शिरूर व पंचक्रोशी ग्रामस्थ यांचा वतीने शिरूर शहरातून “तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले . या यात्रेत मोठ्या संख्येने युवक माजी सैनिक व महिलांसह विविध राजकीय ,सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते .
ऑपरेशन सिंदूर मार्फत सेनेने केलेल्या अद्वितीय शौर्याच्या समर्थनार्थ शिरुर शहरातून तिरंगा पदयात्रा काढण्यात आली . हातात तिरंगे ध्वज घेत पाउसाच्या सरी अंगावर झेलत भारत माता कि जय , वंदे मातारम च्या जयघोष करीत पाकिस्तान मुर्दाबादचा घोषणा यावेळी देण्यात आल्या .
शहारातील बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादना नंतर ही पदयात्रा जुन्या पुणे अहिल्यानगर महामार्गाने हुतात्मा स्मारक चौक (शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय जवळ) येथे आली .
यावेळी भारतीय माजी सैनिक संघटनेचा वतीने शहिद झालेले सैनिक व दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेले २८ पर्यटकांना हुतात्मा स्मारकावर अभिवादन करण्यात आले .
भाजपाचे जिल्हाचे नेते नोटरी धर्मेंद्र खांडरे , भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे , ॲड .मदनदादा फराटे
माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, पंचायत समितीचे माजी सदस्य भगवान शेळके , राजाभाउ मांढरे , प्रिया बिरादार , माजी नगरसेवक विनोद भालेराव , माजी नगरसेवक संदिप गायकवाड , नाना पोटे , गणपतराव फराटे ,माजी सैनिक महादेव घावटे ,खंडु बो-हाडे , मेजर नामदेवराव घावटे , पाटीलबुवा पाचर्णे , नितीन थोरात ,बबनराव पवार, शिवाजी नाना कोहकडे, बंडू तात्या कोहकडे, दत्तात्रय वाखारे, बाळासाहेब शेवाळे, गोरख खेडकर, शिवाजी फलके , भरत घावटे, खंडू बोऱ्हाडे, पडवळ, बबन पवार, शहाजी पवार, जे के कटके, रमेश जासूद, गोरक्ष गरुड , विठ्ठल जाधव, नंदकिशोर रोडे , भाऊसाहेब सोनवणे, नंदू सोनवणे,भाजपाचे माजी शहराध्यक्ष ललित नहार , केशवराव लोखंडे , ॲड .एकनाथ शेलार , विजय नरके , उमेश शेळके , बाबूराव पाचंगे ,प्राचार्य डॉ .समीर ओंकार , नीलेश नवले , सागर नरवडे ,हर्षद ओस्तवाल , कैलास सोनवणे , अविनाश जाधव , मितेश गादिया , अजित डोंगरे ,बाळू महाराज जोशी , मनसेचे माजी शहराध्यक्ष संदिप कडेकर आदी यावेळी उपस्थित होते .

