माजी नगरसेविका सुषमा कांतीलाल बाफना यांच्या संथाराव्रताची पूर्णाहुती
शोभायात्रा सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता यशवंत कॉलनी येथील निवासस्थानापासून निघून अमरधाम येथे जाईल
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}घोडनदी येथील यशवंत कॉलनीतील माजी नगरसेविका सुषमा कांतीलाल बाफना (वय ८१) यांच्या संथाराव्रताची रविवारी (दि. २) रात्री १० वाजता पूर्णाहुती झाली. 
उपाध्याय प्रवर पूज्य श्री प्रविण ऋषीजी महाराज यांच्या मुखारविंदातून रविवारी सकाळी त्यांनी उपवासाचे पच्छखान ग्रहण केले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता पूज्य आभाश्रीजी महाराज यांच्या मुखारविंदातून सजग अवस्थेत सागरी संथारा व्रताचे पच्छखान स्वीकारले. रात्री १० वाजता त्यांच्या संथाराव्रताची पूर्णाहुती झाली.
सुषमा बाफना यांनी नगरसेविका म्हणून कार्य करताना सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्यांच्या निधनाने घोडनदी परिसरातील सामाजिक आणि जैन समाजातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
, सामाजिक कार्यकर्ते संजय बाफना माजी नगरसेवक सुनील बाफना व सौ.मनीषा विनय बोरा यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पार्थिवाची शोभायात्रा सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता यशवंत कॉलनी येथील निवासस्थानापासून निघून अमरधाम स्माशान भूमी शिरूर येथे जाणार असल्याची माहिती बाफना परिवाराने दिली आहे.
