Uncategorizedनिधन वृत्त

माजी राज्यमंत्री मदनजी बाफना यांचे निधन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम, 24}: महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा वडगाव मावळ येथील रहिवासी मदनजी हरकचंदजी बाफना (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि. १४) निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मदनजी बाफना यांनी १९८५ ते १९९५ या कालावधीत दहा वर्षे आमदार म्हणून महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात योगदान दिले. १९८७ ते १९९२ दरम्यान त्यांनी महसूल अर्थ तसेच विधी व न्याय खात्याचे राज्यमंत्री  व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणूनही त्यांची ओळख होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.

सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना बाफना यांनी राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतील सहकाऱ्यांनी शोक व्यक्त केला.

अंत्यदर्शनाची वेळ : मंगळवार (दि. १५) सकाळी ७ ते ९ या वेळेत बाणेर येथील निवासस्थानी, सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत हरकचंद रायचंद बाफना डी.एड. कॉलेज येथे आणि दुपारी १२ ते ३ या वेळेत वडगाव मावळ येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे.

त्यानंतर दुपारी ४ वाजता वडगाव मावळ येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रेस प्रारंभ होऊन वडगाव स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बाफना यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्ट असा परिवार आहे.शिरूर येथील माजी उपनगराध्यक्ष व विद्याधाम प्रशाला शालेय समितीचे माजी अध्यक्ष दिवगंत चंद्रकांत बाफना यांचे ते बंधू होत. तर शिरूर येथील व्यवसायिक प्रकाश बाफना व संजय बाफना यांचे ते काका होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button