Uncategorized

शिरूरमध्ये पोलीस ॲक्शन मोडवर; ६५ वाहनचालकांवर कारवाई

बी. जे. कॉर्नर येथे नाकाबंदी; ८१ हजारांचा दंड वसूल

शिरूर,{ डेली न्यूज पोस्ट टीम 24): शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध शिरूर पोलिसांनी गुरुवारी (दि. २२) कारवाईचा बडगा उगारला. बी. जे. कॉर्नर येथे नाकाबंदी करून पोलिसांनी नियम मोडणाऱ्या ६५ वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण ८१ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

वाहनांच्या काचांना काळ्या फिल्म लावणे, फॅन्सी नंबर प्लेट वापरणे, दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे, प्रखर दिवे लावणे तसेच वैध वाहनचालक परवान्याशिवाय वाहन चालवणे, अशा नियमभंगाच्या प्रकारांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि अपघातांचा धोका कमी करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे वाहनचालकांनी वैध परवाना जवळ बाळगावा, नियमानुसार नंबर प्लेट वापरावी आणि इतर वाहनचालकांना त्रास होईल असे प्रखर दिवे लावणे टाळावे, असे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button