Uncategorized
Check Also
Close

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने अजित पवार गटाचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर पालिकेतील राजकीय गणितांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर भाजप आणि अजित पवार गटाची जवळीक वाढल्याने शहराच्या राजकारणासह तालुक्यातील राजकीय समीकरणांवरही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.भाजपाचे पाठिंबाचे पत्र शहराध्यक्ष नगरसेवक नितीन पाचर्णे यांनी नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांच्याकडे सुपूर्त केले आहे.
संख्याबळाच्या दृष्टीने भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला असतानाही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आल्याने भाजपला सत्तेबाहेर राहावे लागले होते. नगराध्यक्षपदी अजित पवार गटाच्या ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे निवडून आल्या होत्या.






