Uncategorized

संपदा नागरी पतसंस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; सभासदांना ८ टक्के लाभांश जाहीर

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}संपदा नागरी सहकारी पतसंस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सभासदांना आठ टक्के लाभांश देण्याचा निर्णय संस्थेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. संस्थेने ११० कोटी रुपयांच्या ठेवी आणि ८२ कोटी रुपयांचे कर्जवाटप करत आर्थिक प्रगती साधली आहे.

संपदा नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना ९ नोव्हेंबर २००१ रोजी झाली. संस्थेचे कार्यक्षेत्र पुणे, अहिल्यानगर, रायगड, ठाणे आणि बृहन्मुंबई या पाच जिल्ह्यांत असून, १५ शाखांच्या माध्यमातून संस्थेचे कामकाज सुरू आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ अखेर संस्थेला एक कोटी नऊ लाख रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी अधिकारी संपतराव देवराम वाळूंज यांनी दिली.

सभासदांना सुलभ कर्जयोजना, कमीत कमी व्याजदरात कर्जपुरवठा तसेच सोन्याच्या तारणावर तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यावर संस्थेचा भर आहे. शिरूर येथील मुख्य कार्यालयातून स्वमालकीच्या प्रशस्त वास्तूमध्ये अत्याधुनिक सोयी-सुविधांसह सभासदांना सेवा देण्याचा संस्थेचा संकल्प आहे.

२० सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आठ टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व सभासदांनी आपला लाभांश नजीकच्या शाखेतून घेऊन जावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेराम प्रभू घावटे, उपाध्यक्ष अमित ज्ञानदेव गव्हाणे आणि संचालक मंडळाने केले आहे. तसेच सभासदांनी संस्थेच्या विविध कर्ज सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button