विशेषसांस्कृतिक

येसूवहिनींच्या त्यागाची गाथा सांगीतिक अभिवाचनातून उलगडली; ‘मी… येसूवहिनी’ने शिरूरकर भारावले


शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संघर्षमय जीवनप्रवासात मोलाची साथ देणाऱ्या येसूवहिनी सावरकर यांचा त्याग, धैर्य आणि देशभक्तीचा प्रेरणादायी इतिहास शिरूरमध्ये सांगीतिक अभिवाचनातून उलगडला. ‘मी… येसूवहिनी’ या कार्यक्रमाने एका कर्तृत्ववान स्त्रीच्या संघर्षाला प्रभावीपणे उजाळा दिला.

आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन संचलित आकांक्षा विशेष मुलामुलींच्या संस्थेच्या वतीने पुण्यातील ‘समिधा’ प्रस्तुत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संजय गोखले, डॉ. वीणा गोखले, डॉ. चित्रलेखा पुरंदरे, विनोद पावशे, संगीता ठोसर आणि दिलीप ठोसर यांनी सांगीतिक अभिवाचनातून येसूवहिनींचे व्यक्तिमत्त्व, कुटुंबाप्रती असलेली निष्ठा आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान रसिकांसमोर साकारले.
यावेळी संजय गोखले यांनी येसूवहिनींचे शौर्य, धैर्य, देशभक्ती आणि देशकार्यातील सहभाग या पैलूंवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे आतापर्यंत ८१ प्रयोग झाल्याची माहिती त्यांनी दिली.

आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा राणीताई चोरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीता कुलवंत यांनी प्रार्थना सादर केली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. क्रांती पैठणकर यांनी केले.

  1. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या कोमल वाखारे, मनसुखलाल गुगळे, डॉ. मनीषा चौरे, माजी नगरसेविका मनीषा कालेवार, अंकुश घोडे, दत्ता केदारी, डॉ. वैशाली साखरे, गायक गणेश मराठे, हरीष शर्मा, नाना पोटे, मामा धोंगडे, शशिकला काळे आदी उपस्थित होते.यावेळी आकांक्षा चौरे हीच्या २५ व्या वाढदिवस ही साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button