Uncategorizedस्थानिक

शिरूर शहरातील जुन्या पुणे अहिल्यानगर रस्त्यावरील स्पीड ब्रेकरची दुरवस्था;

उघड्या खिळ्यांमुळे अपघाताचा धोका

oplus_131074

शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}वाहनांचा वेग नियंत्रित करून अपघात टाळण्यासाठी बसविण्यात आलेले रबरी स्पीड ब्रेकर आता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. जुन्या पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर बसस्थानकासमोर, विविध लहरी सोमरील, हुतात्मा स्मारक जवळ स्पीड ब्रेकरचे रबर झिजून निघाल्याने त्याखालील टोकदार खिळे उघडे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचे टायर खराब होण्याबरोबरच दुचाकी व चारचाकी वाहने पंक्चर होण्याचे प्रकार वाढले असून अपघाताची भीती व्यक्त होत आहे.

या महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा होते. स्पीड ब्रेकरवरील रबर निघून गेल्याने उघडे पडलेले खिळे वाहनांच्या टायरमध्ये घुसत असून वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हे खिळे धोकादायक ठरू शकतात.

गेल्या अनेक महिन्यांपासून ही परिस्थिती कायम असूनही संबंधित यंत्रणेकडून दुरुस्ती किंवा नवीन स्पीड ब्रेकर बसविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. सुरक्षिततेसाठी बसविलेल्या स्पीड ब्रेकरची देखभाल न झाल्याने तेच आता अपघातांना निमंत्रण देत आहेत.

बसस्थानकासमोरील धोकादायक स्पीड ब्रेकर तातडीने दुरुस्त करून नवीन रबरी स्पीड ब्रेकर बसवावेत आणि वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित करावा, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button