शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}जिद्द, चिकाटी, संघर्ष आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शिरूर परिसरातील नऊ कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव गुरुवारी (दि. २९) ‘नवदुर्गा सन्मान २०२६’ पुरस्काराने करण्यात येणार आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत आपल्या कार्यातून समाजाला प्रेरणा देणाऱ्या या नवदुर्गांच्या प्रवासाची ओळख करून देणाऱ्या ‘डेली न्यूज पोस्ट २४’च्या उपक्रमाचा हा सन्मान सोहळा गुरुवारी सायंकाळी चार वाजता बाबुरावनगर येथील डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होणार आहे.


स्वतःच्या कर्तृत्वाने अनेकांसाठी आशेचा किरण बनलेल्या या महिलांचा गौरव म्हणजे केवळ पुरस्कार वितरण नव्हे, तर संघर्षातून उभ्या राहिलेल्या जिद्दीचा, शिक्षणातून मिळालेल्या सामर्थ्याचा आणि समाजासाठी झटणाऱ्या स्त्रीशक्तीचा सन्मान ठरणार आहे. साहित्य, शिक्षण, ग्रामविकास, उद्योजकता, अभिनय, क्रीडा आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या या नवदुर्गांच्या यशस्वी वाटचालीला या सोहळ्यात सलाम केला जाणार आहे.





वंचितांच्या वेदना साहित्यातून मांडणाऱ्या लेखिका कविता पाचंग्रे, अभिनयाचा वारसा नसतानाही स्वतःच्या मेहनतीने पुढे आलेली अभिनेत्री प्रतीक्षा बारवकर, ग्रामीण भागातून येऊन स्पर्धा परीक्षार्थींच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या राजमाता जिजाऊ अभ्यासिकेच्या प्रमुख प्रा. अलका बेलोटे (बोरुडे), सामाजिक प्रश्नांवर संघर्ष करत सामान्यांना मदतीचा हात देणाऱ्या जिम ट्रेनर व सामाजिक कार्यकर्त्या प्रिया बिरादार, शिक्षणाच्या माध्यमातून वंचितांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटविण्यासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुनीता भोसले आणि ग्रामीण भागातून क्रिकेटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणारी उदयोन्मुख खेळाडू आरती दसगुडे या नऊ नवदुर्गांचा सन्मान करण्यात येणार आहे.
आणि वडिलांना मदत केली. संकटाच्या क्षणी दाखविलेल्या या धैर्याची दखल घेत श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या वतीने मानवीचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. चिमुरडीच्या या धाडसातून संकटसमयी वयापेक्षा धैर्य मोठे असते, याचा प्रत्यय आला.



