Uncategorizedशैक्षणिक

संध्या बेंद्रे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या संध्या नितीन बेंद्रे यांना बारामती येथील शब्दधन सोशल फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संध्या बेंद्रे गेल्या काही वर्षांपासून शिरूर येथील ज्ञानगंगा विश्वविद्यालय, बाबुराव नगर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच विविध स्पर्धा व परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याचे काम त्या सातत्याने करीत आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थ्यांनी मंथन तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेले प्रयत्न, अध्यापनातील नावीन्यपूर्ण उपक्रम आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शब्दधन सोशल फाउंडेशनने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली.
या सन्मानामुळे ज्ञानगंगा विश्वविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला तसेच शिरूरच्या शैक्षणिक क्षेत्राला गौरव प्राप्त झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button