विशेष
शिरूरमध्ये मातोश्री प्रतिष्ठान व भूमिपुत्र प्रतिष्ठानच्यावतीने घरगुती गणपती-गौरी सजावट स्पर्धेची रंगत
गणराया करंडक २०२६’सह ‘सेल्फी विथ बाप्पा’ स्पर्धेचे आयोजन
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम _24}गणेशोत्सवानिमित्त शिरूर शहरात घरगुती गणपती व गौरी सजावटीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध संस्थांच्या वतीने आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भूमिपुत्र प्रतिष्ठाणच्या वतीने ‘मा. श्री. प्रकाशभाऊ रसिकलाल धारीवाल गणराया करंडक २०२६’ अंतर्गत घरगुती गौरी-गणपती सजावट तसेच ‘सेल्फी विथ बाप्पा’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सजावट स्पर्धेतील देखावे स्पर्धकांनी स्वतः तयार केलेले असणे आवश्यक असून एका घरातील केवळ एकाच व्यक्तीस सहभाग घेता येणार आहे.

स्पर्धकांनी १४ ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आपल्या सजावटीचे फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सॲपद्वारे ७२१९५४९००२ या क्रमांकावर पाठवायचे आहेत. त्यासोबत पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि कोणत्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे, याची माहिती देणे आवश्यक आहे.
१८ सप्टेंबरनंतर पाठविलेले फोटो व व्हिडिओ स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. या क्रमांकावर केवळ व्हॉट्सॲप संदेश करावा, फोन करू नये, असे आयोजकांनी कळविले आहे. स्पर्धेचे आयोजन भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष सुशांत किशोर कुटे यांनी केले आहे.
दरम्यान, मातोश्री कला, क्रीडा व शैक्षणिक प्रतिष्ठाण, शिरूर यांच्या वतीनेही शिरूर शहर, बाबुरावनगर व रामलिंग रोड परिसरातील भाविकांसाठी भव्य घरगुती गणपती व गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पर्यावरणपूरक गणपती व गौरी सजावटीसाठी स्वतंत्र बक्षिसाची तरतूद करण्यात आली आहे.
गणेशोत्सवातील पारंपरिक कलाकुसर, सर्जनशीलता आणि पर्यावरणपूरक सजावटीला प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मातोश्री प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत मुकुंदराव आंबेकर यांनी स्पर्धेची माहिती दिली.


