शिरूरमध्ये १ नोव्हेंबरला ‘रिवाझ गोल्ड’ दालनाचा दिमाखदार सोहळा; राजकीय व प्रशासकीय दिग्गजांची उपस्थिती

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
सुवर्णालंकार क्षेत्रातील नवीन दालनाचा विस्तार करत शिरूरमध्ये ‘Rrivaaz Gold’ (रिवाझ गोल्ड) या सोन्याच्या भव्य दालनाचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. पुणे – नगर रस्त्यावरील बाबुरावनगर येथील हायवे सेंटर मॉल (ज्युडिओ मॉलशेजारी) येथे हे अत्याधुनिक सोन्याचे दालन ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे.
व्यावसायिक विस्तारासोबतच शिरूरकरांना विश्वासार्ह व दर्जेदार दागिन्यांची दालनसेवा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रा. डॉ. राजेराम घावटे, डॉ. संदिप कोकरे व अमित शाह यांनी सांगितले.
राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक दिग्गजांची मांदियाळी
या सोहळ्याला राजकीय, प्रशासकीय, सामाजिक व पोलीस यंत्रणेतील विविध मान्यवर उपस्थित राहून नूतन दालनास शुभेच्छा देणार आहेत.

अहिल्यानगरचे खासदार निलेशजी लंके, आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके (शिरूर-हवेली), आमदार विक्रमजी पाचपुते (श्रीगोंदा), आमदार बापूसाहेबजी पठारे (वडगाव शेरी), आमदार काशिनाथजी दाते सर (पारनेर), आमदार महेशबापू लांडगे (भोसरी), आमदार राहुलजी मोटे (भूम परांडा) आणि माजी आमदार अशोकबापू पवार (शिरूर-हवेली) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच, म्हाडा पुणेचे अध्यक्ष शिवाजीदादा आढळराव पाटील, माणिकचंद उद्योग समूहाचे प्रकाशशेठ धारिवाल, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, शिरूरच्या नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्याताई अभिजित पाचर्णे, पंचायत समिती शिरूरच्या सभापती सौ. स्वातीताई विठ्ठलशेठ घावटे, भाजप तालुकाध्यक्ष राहुलदादा पाचर्णे यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.
नाशिकचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बंगळुरूचे पोलीस अधीक्षक अक्षय हाके, मुंबईचे जिल्हा अधीक्षक शिवदास गुंड, अप्पर जिल्हाधिकारी स्नेहा देवकाते, पोलीस उपअधिक्षक प्रशांत ढोले यांची प्रमुख उपस्थिती असेल.

याशिवाय उपजिल्हाधिकारी उदय किसवे, पोलीस उपअधिक्षक रवींद्र भोसले, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक विनोद पाटील (शिरूर), पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे (मंचर), शिरूरचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील,
भूमी उपअधिक्षक अमोल भोसले, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेशराव बिराजदार, तहसीलदार आकाश किसवे, शिरूर शहर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुलदत्त पाटील, शिरूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विकास फडतरे आणि शिरूर ग्रामीणच्या सरपंच सौ. शिल्पाताई गायकवाड आदी मान्यवर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
रिवाझ गोल्ड परिवाराकडून स्नेहाचे निमंत्रण
गंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजाराम घावटे सर, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. संदीप कोकरे आणि व्ही. के. ज्वेलर्सचे अमित शाह यांच्यासह ‘रिवाझ गोल्ड परिवार’ या सोहळ्याचे यजमानपद भूषवत आहेत.
या शुभारंभाच्या निमित्ताने शिरूर व परिसरातील नागरिकांनी, ग्राहकांनी तसेच हितचिंतकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आदरयुक्त आवाहन ‘रिवाझ गोल्ड परिवार’च्या वतीने करण्यात आले आहे.
