Uncategorizedराष्ट्रीयविशेष
संघर्ष, जिद्द आणि कर्तृत्वाचा जागर; ‘डेली न्यूज पोस्ट २४’च्या नवदुर्गा सन्मानाने नऊ स्त्रीशक्तींचा गौरव!
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रांत ठसा उमटविणाऱ्या नऊ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; चिमुरडी मानवी छाजेडच्या धाडसाचाही विशेष गौरव; नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक





शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}प्रत्येक स्त्रीमध्ये असामान्य कर्तृत्व दडलेले असते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द, धाडस, संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर ती स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करू शकते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच विविध क्षेत्रांत प्रामाणिकपणे काम करून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेत ‘डेली न्यूज पोस्ट २४’ने आयोजित केलेला ‘नवदुर्गा सन्मान २०२६’ हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार शिरूरच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी काढले.


जिद्द, चिकाटी, संघर्ष आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत साहित्य, शिक्षण, ग्रामविकास, उद्योजकता, अभिनय, क्रीडा आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत स्वतःचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या शिरूर परिसरातील नऊ कर्तृत्ववान महिलांचा ‘डेली न्यूज पोस्ट २४’च्या वतीने ‘नवदुर्गा सन्मान २०२६’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. नवरात्रीच्या नऊ दिवसांत समाजाला आपल्या कार्यातून प्रेरणा देणाऱ्या या नवदुर्गांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाची ओळख समाजासमोर आणणाऱ्या या उपक्रमाचा सन्मान सोहळा बाबुरावनगर येथील डेक्कन एज्युकेशन इंग्लिश व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा नव्हता, तर परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या स्त्रीशक्तीच्या जिद्दीला सलाम करणारा होता. कोणाच्या वाट्याला संघर्ष आला, कोणाला परिस्थितीशी झुंज द्यावी लागली, तर कोणाला आपल्या स्वप्नांसाठी सातत्याने मेहनत घ्यावी लागली. मात्र, अडचणींना संधी मानून पुढे जाण्याच्या वृत्तीने या महिलांनी आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटविला. त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.
जैन युवा परिषद घोडनदीचे प्रकाश बाफना, प्राचार्य डॉ. अमोल शहा, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, शासनाचा कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी नितीन थोरात, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे, तर्डोबावाडीचे उपसरपंच गणेश खोले, मुख्याध्यापक विनायक म्हसवडे, भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे, मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित आंबेकर, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे राजू शेख, अविष्कार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विलास आंबेकर, एस.टी. कामगार संघटनेचे नेते माधव मुंडे, काँग्रेसचे नेते अजिमभाई सय्यद, ग्राहक पंचायतीचे प्रवीण मुथा, अतुल बोथरा, विनोद बोथरा, रणजित गायकवाड, अशोक काळे, सिकंदर मण्यार, गोपीनाथ पठारे,
अशोक भोसले, व्यावसायिक प्रमोद वाघचौरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हरी शर्मा, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली साखरे, उर्मिला बारवकर, बाळासाहेब दसगुडे आदी उपस्थित होते.



सेवाभावाचा आदर्श निर्माण केला आहे. तर ग्रामीण भागातून क्रिकेटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या उदयोन्मुख खेळाडू आरती दसगुडे यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्रामीण मुलींसमोर नवा आदर्श ठेवला आहे.



