महाराष्ट्र
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर तालुक्यात कृषी, पर्यावरण, जलव्यवस्थापन, गोसेवा आणि सेवाकार्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी बाबुराव दौंडकर स्मारक समितीतर्फे यंदाचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
गेल्या २९ वर्षांपासून समिती तालुक्यात काम करीत आहे . समाजात निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा सन्मान बाबुराव दौंडकर स्मारक समिती करत असून त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.


शिरूर तालुक्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कारार्थींचा गौरव सोहळा करिता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष ॲड. धर्मेंद्र खांडरे यांनी केले आहे.



