महाराष्ट्र

व्हिजन इंटरनॅशनल स्कूल ला ‘India’s Best Schools 2026’मध्ये AAA+ मानांकन

शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24,}शिरूर येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कुल शिरूर च्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘India’s Best Schools 2026’ या मानांकनामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी Day School Category मध्ये AAA+ रेटिंग मिळविण्याचा बहुमान स्कुल ने प्राप्त केला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विकास पोखरणा यांनी दिली

पोखरणा यांनी सांगितले की शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थिकेंद्रित शिक्षणपद्धती, गुणवत्तापूर्ण शिक्षकवर्ग तसेच आधुनिक व सक्षम पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांची दखल घेत मिळालेले AAA+ मानांकन हे शाळेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.

शाळेचे दूरदर्शी संस्थापक व चेअरमन विकास पोखरणा यांच्या नेतृत्वाखाली व्हिजन इंटरनॅशनल स्कुल ने गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावरही विशेष भर दिला आहे. शाळेच्या या यशामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवृंदाचे मोलाचे योगदान असल्याचे मुख्याध्यापिका पसक्कीन कासी यांनी सांगितले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल व्हिजन स्कुलच्या विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि व्यवस्थापनाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button