Uncategorized

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भीमा नदीपात्रात टाकलेली मोटार काढण्यासाठी गेलेल्या साहेबराव बबन मुळीक (वय ५१, रा. दहिवडी, ता. शिरूर) हे नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. तीन दिवसांच्या शोधानंतर त्यांचा मृतदेह सापडला.

याबाबत त्यांचा मुलगा आदेश साहेबराव मुळीक (वय २४) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास कुरळगाव येथे असताना गावातील लहू आभाळे यांनी भीमा नदीपात्रात टाकलेली मोटार काढायची असल्याचे सांगून साहेबराव मुळीक यांना सोबत नेले. मोटार काढण्याचा प्रयत्न करत असताना मुळीक हे नदीच्या पाण्यात वाहून गेले.

त्यानंतर पीएमआरडीएच्या पथकासह नागरिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात आला. अखेर ११ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास रांजणगाव सांडस येथील पोलीस पाटलांना नदीच्या पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो साहेबराव मुळीक यांचा असल्याची त्यांच्या मुलाने खात्री केली.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक १३०/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार काळे यांनी नोंद केली असून, पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

दुसरा घटनेत शिरसगाव काटा, ता शिरूर येथे किशोर दत्तात्रेय चव्हाण (वय ३७) यांनी राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याबाबत किशोर यांचे भाऊ सचिन दत्तात्रेय चव्हाण (वय ३८, व्यवसाय शिक्षक, रा. शिरसगाव काटा) यांनी शिरूर पोलिसांना खबर दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता किशोर यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती त्यांच्या वहिनी स्नेहल यांनी फोनवरून सचिन चव्हाण यांना दिली. त्यानंतर किशोर यांना उपचारासाठी मांडवगण फराटा येथील वरद विनायक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक १३१/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार काळे यांनी नोंद केली असून, पोलीस हवालदार गवळी तपास करीत आहेत.

दोन्ही घटनांबाबत शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button