महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबतच्या वक्तव्याचा निषेध; शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी शिरूर तहसीलदार कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित वक्तव्याचा निषेध करत याबाबत माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे, शिरूर नगरपरिषद सभापती स्वाती साठे, आयेशा सय्यद, माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, शहराध्यक्ष शरद कालेवार, शहर महिला अध्यक्षा श्रुतिका झांबरे, शहर युवक अध्यक्ष एजाज बागवान, तालुका युवती अध्यक्षा तज्ञिका कर्डिले, रंजन झांबरे, बबनराव वाळके, पंचायत समितीचे माजी सदस्य रामभाऊ कदम, जयवंत साळुंखे, श्रीनिवास घाडगे, संतोष शितोळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेली टिप्पणी अयोग्य असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे यांनीही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वापरलेल्या शब्दप्रयोगावर आक्षेप घेतला. राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नसल्याचे सांगत सपकाळ यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी श्रुतिका झांबरे, श्रीनिवास घाडगे, तज्ञिका कर्डिले, रामभाऊ कदम आणि जयवंत साळुंखे यांनीही मनोगते व्यक्त करून संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदविला.

आंदोलनानंतर नायब तहसीलदार स्नेहल गिरगोसावी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सादर केले.∞

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button