महाराष्ट्र

शिरूर बायपासचा डी.पी. रोड वाहतुकीसाठी तातडीने खुला करा

भाजपा नगरसेवक यांची मागणी

नगरसेवक संतोष थेऊरकर यांना वाढदिवसानिमित्त डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने हार्दिक शुभेच्छा

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर बायपास येथील सर्वे नं. ११४३ ते गार्डन रोडपर्यंतचा डी.पी. रोड नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत भाजपा नगरसेवक यांनी शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांना निवेदन दिले.यासंदर्भात माहिती देताना नगरसेवक संतोष थेऊरकर यांनी सांगितले की गेल्या पाच दिवसांत या परिसरात झालेल्या दोन अपघातांत तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सदर डी.पी. रोड खुला करण्याची मागणी जोर धरत आहे.भाजप गटनेते नितीन पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रस्ता सुरू करण्यासाठी वन विभाग, म्हाडा तसेच संबंधित शासकीय विभागांकडून आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. यासाठी भाजपच्या नगरसेवकांकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी डी.पी. रोड तातडीने वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर लवकरच संबंधित ठिकाणी स्थळ पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. डी.पी. रोड वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत योग्य ते प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिल्याचे नगरसेवक संतोष थेऊरकर यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक संतोष थेऊरकर, सागर नरवडे, निलेश पवार,अमित कर्डीले, नगरसेविका सुनीता भुजबळ, सुनीता करुंदळे, पूजा पोटावळे , रिंकू जगताप, उमेश शेळके आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button