विशेष
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा करताना पर्यावरणाचेही संवर्धन व्हावे, या उद्देशाने व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने यंदाही ‘तुरटीचा गणपती’ हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहे. सलग पाच वर्षांपासून शाळेकडून हा अभिनव उपक्रम राबवून प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश दिला जात आहे.


‘भक्तीही जपूया… पर्यावरणही जपूया!’ या संदेशातून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.