Related Articles
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर तालुक्यातील न्हावरा येथील तांबे-तरटे वस्ती परिसरात गुरुवारी (दि. ३०) पहाटे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबटया जेरबंद झाला. सुमारे सहा वर्षांचा नर बिबट पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात अडकल्याची माहिती तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली.
गुरुवारी पहाटे बिबट पिंजऱ्यात अडकल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षितरीत्या त्याचा ताबा घेतला.
पुढील देखभाल आणि आवश्यक प्रक्रियेसाठी रवाना करण्यात आल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.

