Uncategorizedराष्ट्रीयसांस्कृतिक

शिरुरचे डॉ . संतोष पोटे , डॉ सुनिता पोटे व कौशिक मेहता निर्मित ‘ म्हणजे वाघाचे पंजे ‘ मराठी चित्रपट ३० मे रोजी होणार प्रदर्शित . अभिनेता संजय नार्वेकर ,दिपाली सय्यद , तमन्ना बांदेकर , सिध्दार्थ झाडबुके , प्राजक्ता हनमघर व सौरभ गोखले यांच्या भूमिका

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
शिरुरचे डॉ . संतोष पोटे व डॉ . सुनीता पोटे आणि कौशिक मेहता यांची निर्मिती असलेल्या ‘ म्हणजे वाघाचे पंजे ‘ हा मराठी चित्रपट येत्या ३० मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे .
शिरुरचे  डॉ . संतोष पोटे व डॉ .सुनिता पोटे यांनी मनोरंजनासह सामाजिक मेसेज देणा-या चित्रपटांची यापुर्वी निर्मिती केलेली आहे . ‘ कोती ‘ हा चित्रपट त्यांच्या विशेष गाजला आहे .
दरम्यान त्यांची व कौशिक मेहता यांची निर्मिती असलेल्या ‘ म्हणजे वाघाचे पंजे ‘ या चित्रपटाच्या प्रदर्शना संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी चित्रपटाचे निर्माते डॉ .संतोष पोटे व डॉ .सुनीता पोटे आणि कौशिक मेहता , चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरुप सावंत, चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री तमन्ना बांदेकर ,आदी उपस्थित होते .चित्रपट निर्मात्या डॉ . सुनीता पोटे म्हणाल्या की दर्जेदार व सामजिक विषयावर आम्ही चित्रपट काढतो . आमच्या प्रत्येक चित्रपटातून काहीना ना मेसेज देतो . ‘म्हणजे वाघाचे पंजे ‘हा विनोदी चित्रपट असून या चित्रपटातून  ही सामाजिक मेसेज  दिलेला आहे .

 

या चित्रपटात आई व मुलीची कथा आहे . बॉलीवूड ट्च या चित्रपटास देण्याचा प्रयत्न केला आहे चित्रपटातील गाणी श्रवनीय झाली आहेत .चित्रपटात अभिनेते संजय नार्वेकर यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे .
नार्वेकर यांच्या बरोबर काम करण्यास मिळणे ही खूप भाग्याची व आनंदाची बाब होती . नार्वेकर यांच्या बरोबर सौरभ गोखले, दीपाली सय्यद , सिध्दार्थ झाडबुके , निखील चव्हाण , प्राजक्ता हनमघर , चिन्मय उदगिरकर , अनिल नगरकर , मेघराज राजे भोसले घनश्याम दरोडे , यांच्या यात भूमिका आहे असे बांदेकर यांनी सांगितले भविष्यात अभिनेते सुबोध भावे यांच्या समवेत काम करायच असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपटास हर्षवर्धन वावरे व त्रीनिती यांनी संगीत दिले आहे .
डॉ . संतोष पोटे म्हणाले की दिग्दर्शक स्वरुप सांवत यांनी दिग्दर्शित केलेल्या म्हणजे वाघाचे पंजे प्रेक्षकांचा पसंतीस नक्की उतरेल . चित्रपटगृहात जावून हा चित्रपट सर्वांनी पाहावा येत्या ३० मेला या चित्रपट प्रदर्शित होत आहे .
कौशिक मेहता यांनी ही चित्रपटाविषयी माहिती दिली . प्रवीण गायकवाड यांनी सूत्रअक संचालन तर आभार डॉ . संतोष पोटे यांनी मानले .चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरुप सावंत हे शिरुरच्या दसगुडे परिवाराचे जावई आहेत .

बांधकाम व्यवसायिक राजेंद्रदादा दत्तात्रय देशमुख यांना डेली न्यूज पोस्ट टीम -24 चा वतीने भावपूर्ण आदरांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button