Uncategorizedराष्ट्रीयविशेष

शिरुर शहरात सोमवार १९ मे रोजी तिरंगा पदयात्रा. नागरिकांनी मोठ्या संख्येने तिरंगा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)समस्त राष्ट्रभक्त शिरूर व पंचक्रोशी ग्रामस्थ यांचा वतीने सोमवार दिनांक १९  मे २०२५ रोजी शिरूर शहरात सायंकाळी ४ वाजता “तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे . ऑपरेशन सिंदूर मार्फत भारतीय  सेनेने केलेल्या अद्वितीय शौर्याच्या समर्थनार्थ तिरंगा पदयात्रा काढण्यात येत असून शहारातील बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादनानंतर ही पदयात्रा जुन्या पुणे अहिल्यानगर  महामार्गाने  हुतात्मा स्मारक चौक (शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय जवळ) येथे जाईल व तिथे पदयात्रेचा  समारोप होईल.

बांधकाम व्यवसायिक राजेंद्रदादा दत्तात्रय देशमुख यांना डेली न्यूज पोस्ट -24 च्या वतीने भावपूर्ण आदरांजली
“ऑपरेशन सिंदूर” माध्यमातून हा एक  मोठा विजय  जवानांनी  मिळवला आहे. भारतीय जवानांबद्दल  कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “तिरंगा पद यात्रेत” मोठ्या संख्येने  सहभागी होण्याचे आवाहन शिरुरकरांना करण्यात आले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button