Uncategorizedअपघात

डंपर व पिकअप अपघातात दोन जण ठार तर एक जखमी

शिरुर दिनांक ( वार्ताहर )मांडवगण फराटा ,ता .शिरुर येथे डंपर व पिकअपच्या अपघातात दोन जण मरण पावले तर  एक जण गंभीर जखमी झाले  .सागर संभाजी कोळपे वय २८ वर्षे रा. मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे याचे व यश सुधाकर भिसे १२ वर्षे सध्या रा. मांडवगण फराटा, कोळपेवरती ता. शिरूर जि. पुणे मुळ राहणार – खेडवाडी ता. गेवराई जि. बीड अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत .

       याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दादा बाळासो कोळपे वय ३८ वर्षे, धंदा शेती रा. मांडवगण फराटा, कोळपेवस्ती ता. शिरूर जि. पुणे यांनी  डंपर वाहन नंबर एम. एच .४२ से. क्यु ७६९६ वरील अज्ञात चालका विरोधात फिर्याद दिली आहे .
हा अपघात १७ मे रोजी रात्री आठ वाजता  मांडवगण फराटा येथील   मांडवगण फराटा ते वडगाव रासाई जाणारे रोडवर झाला .
मांडवगण  फराटा ते वडगाव रासाई रस्त्यावर  मांडवगण फराटा बाजुकडुन वडगाव रासाई बाजुकडे जाणारा डंपर वाहन नंबर एम. एच .४२ से. क्यु. ७६९६  यावरील चालक  याने त्याचे ताब्यातील  डंपर हा हयगईने, अविचाराने भरधाव वेगात चालवुन रॉन्ग साईडला जावुन समोरून येणा-या  सागर संभाजी कोळपे याचे ताब्यातीत पिकअप वाहन नंबर एम .एच .०३- ०६३८  हीला समोरून धडक दिली . या अपघातात  सागर संभाजी कोळपे वय- २८  वर्षे , यश सुधाकर भिसे -१२  वर्षे , यांना किरकोळ व गंभीर दुखापती होवून ते मरण पावले तर अनिल बीरा कोळपे रा. मांडवगण फराटा, कोळपेवस्ती  ता. शिरूर जि. पुणे हे जखमी झाले .
 पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर नकाते करीत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button