महाराष्ट्र

पाबळफाटा ते पाषाण मळ्यापर्यन्त चालू असलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी


शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24 ) पाबळफाटा ते पाषाण मळ्यापर्यन्त चालू असलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून कामाची बिले स्थगित करण्याची मागणी जिल्हाधिकारी पुणे यांच्या कडे करण्यात आली आहे.
याबाबत मनसेचे जिल्हा उपप्रमुख महिबूब सय्यद , अनिल बांडे , रवि लेंडे व अविनाश घोगरे यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिले आहे .
                 मागील सात आठ महिन्यांपासुन शिरुर शहरामध्ये पाबळ फाटा ते पाषाण मळा रस्त्याचे काम चालु आहे. सदर काम हे डि.पी.च्या मंजुर नकाशाप्रमाणे होणे आवश्यक आहे . डि.पी. रस्ता हा 30 मीटरचा असूनही रस्त्यातच पावसाळी पाण्याचे आरसी गटार उभारण्यात आले आहे . भविष्यामध्ये रस्ता रुंदीकरण करावे लागणार आहे व त्यावेळी हे उभारलेले आर.सी.सी. गटार तोडावे लागेल यामुळे प्रशासन डी .पी .प्लॅन धाब्यावर बसवून पैसा गटारीत घालत आहे ही गंभीर बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे .
बनविण्यात येणारा रस्ता हा अंदाजपत्रकापेक्षा वेगळा आहे. भर पावसामध्ये डांबरीकरण व सिलकोट करण्यात येत . दिनांक ०७ जून २०२५ रोजी झालेल्या पावसामुळे मार्केटयार्ड समोरील व प्रितमप्रकाश नगर समोरील रस्त्यावर पाणीच पाणी साचल होते. मग बनविण्यात आलेल्या आर.सी.सी. गटारी या ‘पाणी वाहून नेण्यासाठी बनविल्या आहेत कि देखाव्याच्या आहेत .
शिरुर नगरपरिषद शेजारील रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आलेले दुभाजक हे पैसे वाचविण्यासाठी अंदाज पत्रकाला बगल देऊन कमी-जास्त उंचीचे उभारले आहेत . दुभाजक योग्य ती खोदाई करून टाकणे आवश्यक होते. गटारीची अवस्था भिषण आहे. गटारीत पाणी जात नाही, गटारी कमी-जास्त उंचीच्या उभारल्या मुळे काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शिरुर नगरपरिषदेने शासन निधीचे ७ कोटी रुपये भर पावसाळ्यात पाण्यात घातल्याचे निर्दशनास येत आहे. शिरुर नगरपरिषद वारंवार शासन निर्णयांची पायमल्ली करीत आहे. रस्त्याच्या व आर.सी.सी गटारीच्या कामाची जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत चौकशी करण्यात यावी व शिरुर शहरात अंदाजपत्रकाला बगल देवून चाललेल्या रस्त्याच्या व आर.सी.सी. गटारीच्या काम करणा-या ठेकेदाराना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश द्यावेत अशी ही मागणी निवेद्नात करण्यात आली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button