Uncategorized

गुटखा, पानमसाला सुंगधित तंबाखू साठा विक्री केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

शिरूर( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु इ. तत्सम अन्न पदार्थाचा विक्री हेतु महाराष्ट्र राज्यामधुन उत्पादन, वाहतुक साठा, विक्री आदेशाचे भंग केल्या प्रकरणी हिमांशु धर्मविर सिंग, वय २३ वर्ष, सध्या रा. जिओ पेट्रोलपंपासमोर, पुणे अहिल्यानगर बायपास शेजारी ,ता. शिरूर ,जि. पुणे याचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नितेश दत्तात्रय थोरात, पोलीस कॉन्स्टेबल व नं 2589, नेमणुक शिरूर पोलीस स्टेशन यांनी याप्रकरणी
हिमांशु धर्मविर सिंग, वय 23 वर्ष यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे .
८ जुन २०२५ रोजी शिरुर येथे जिओ पेट्रोलपंपा समोरील अहिल्यानगर पुणे रोडवरील पुणे बाजुकडे जाणारे लेनजवळील आदीत्य स्नॅक्स सेंटर टपरी पाठीमागे असणारे रूममध्ये हिमांशु धर्मविर सिंग, वय 23 वर्ष याच्या खोलीमध्ये १ लाख १६ हजार रु. किंमतीचा हिरा पान मसाला, विमल पान मसाला, गोवा पान मसाला, रॉयल टोबॅको, व्ही .वन .टोबॅको, डायरेक्टर स्पेशल पान मसाला, शॉट 999 टोबॅको, रॉयल 717 टोबॅको पान मसाला पुडे असा माल विक्रीसाठी बाळगले स्थितीत मिळुन आला आहे. सिंगने प्रतिबंधित अन्न पदार्थाचा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता विक्री हेतु साठा करून महाराष्ट्र शासनाच्या वतीने अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन, मुंबई यांनी अन्न सुरक्षा व मानदै कायदा 2006 अन्वये अधिसुचना क. असुमाआअधिसुचना-/581/2824/7, दि. 12. जुलै 2024 नुसार जारी केलेल्या प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु इ. तत्सम अन्न पदार्थाचा विक्री हेतु महाराष्ट्र राज्यामधुन उत्पादन, वाहतुक साठा, विक्री आदेशाचे भंग केलेले आहे.
याबाबत आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस इन्स्पेक्टर शुभम चव्हाण करीत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button