विशेषसांस्कृतिक

आगामी काळात नाट्य व चित्रपट क्षेत्रात नावीन्यपूर्ण विषयाची मांडणी करित राहणार : सिने व नाट्यदिग्दर्शक दीपक घारु

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
रसिकांनी व प्रेक्षकांनी आपल्याला भरपूर प्रेम व मान सन्मान दिला असून शिरुरकरांनी दिलेल्या जीवन गौरव सन्मान व मानपत्राने आपण भारावून गेलो असून हा आपल्या आयुष्यातील विशेष प्रसंग असून आगामी काळात नाट्य व चित्रपट क्षेत्रात नावीन्यपूर्ण विषयाची मांडणी करित राहणार असल्याचे सिने व नाट्यदिग्दर्शक दीपक घारु म्हणाले .
सिने व नाट्यदिग्दर्शक दीपक घारु यांच्या प्रदीर्घ नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्याचा गौरव जीवन गौरव सन्मान व मानपत्र देऊन दीपक घारु जीवन गौरव समिती व समस्त शिरुरकर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला .
यावेळी सिने अभिनेते व दिग्दर्शक भाऊराव क-हाडे, चित्रपट निर्माते डॉ . संतोष पोटे , अभिनेते किशोर साव , माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे, सुवर्णा लोळगे, राजेंद्र क्षीरसागर , लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक , शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार , लायन्स क्लब चे माजी अध्यक्ष रमेश कर्नावट , घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग थोरात , आम्ही शिरुरकर फाउंडैशनचे रवींद्र सानप , मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, माजी सभापती ॲड . प्रदीप बारवकर , मुख्याध्यापिका ज्योती मुळे ,डॉ . समता भिसे , उषा वाखारे ,ॲड . विक्रम पाचंगे , ॲड . सुभाष जैन ,पोपटलाल ओस्तवाल , शीला गोडबोले , माजी नगरसेविका रोहिणी बनकर , मंगेश खांडरे ,नंदकुमार पिंजरकर , राहूल बोथरा , ॲड . दिलिप कांबळे , ॲड . वसंत उबाळे , आर . वाय . पोटावळे , आप्पासाहेब मास्तोळी , प्रितेश गादिया ,बाबा गायकवाड , नितीन गायकवाड ,  मुख्याध्यापिका अश्विनी घारु , उल्हास साखरे , आदी यावेळी उपस्थित होते .
रवींद्र धनक यावेळी म्हणाले की व्यक्तीच्या जडणघडणीत सांस्कृतिक अंग ही विकसित होणे गरजेचे आहे .रंगकर्मी दिपक घारु यांनी निष्ठेने कला क्षेत्रात काम करुन आपले वेगळे स्थान कलेचा प्रांतात निर्माण केले आहे .
लोकभावना व लोकव्यथा मांडणे हे कलावंताचे काम असल्याचे ते म्हणाले .
अभिनेते किशोर साव म्हणाले आपले आस्तित्व व ओळख आपल्या कामातून दिसले पाहीजे .
ॲड . सुभाष पवार यांनी शिरुर शहरात नाट्यगृहाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपक घारु व त्याच्या पत्नी अश्विनी घारु यांच्या सन्मान मानपत्र व जीवन गौरव सन्मानचिन्ह देवून करण्यात आला .विलास गोसावी ,
रमेश कर्नावट , मनिषा गावडे , पांडुरंग थोरात , जाकिरखान पठाण , प्रवीण गायकवाड , स्मिता आगरकर , रवींद्र सानप , यांची मनोगते झाली .
मनोज तातेड यांनी दीपक घारु वर केलेल्या कवितेचे वाचन ॲड . सुभाष जैन यांनी केले . प्रास्ताविक ॲड . ओमप्रकाश सतीजा यांनी तर मानपत्राचे वाचन विलास गोसावी यांनी केले .सूत्र संचालन प्रा . सतीश धुमाळ यांनी केले .
झिजॉय चित्रपटातील कलावंत ,तंत्रज्ञ गायक कलाकार अभिनेत्री सुप्रिया गट
रुपेश पसपूल ,राधाकृष्ण कराळे ,डॉ, सुरेश शिंदे ,युगान्त कुतवळ,विजयकुमार नेटके ,मोना बाले कुतवळ ,प्रिया ससाणे ,सुधीर कुलकर्णी ,विद्या जोशी ,श्वेता गमे ,केतकी नवगिरे ,सीमा घारू ,अनुष्का तंटक,श्रावणी बनकर ,नक्षत्रा पटवर्धन,सिद्धी कुलकर्णी ,शौर्य वाळसे ,आर्यन साखरे ,अर्णव साखरे ,वीर घारू ,विनीत ननवरे ,विलास गोसावी ,दिलावर शिकलगार ,नितीन लचके ,आदर्श गोसावी ,रोहिदास अवचिते ,स्मिता अवंतिका मंडलिक ,तुषार रणनवरे,आर्यन भट ,दादा ननवरे ,शुभम गाडे ,किशोर साव यांचाही यावेळी सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला .
दीपक घारु हे नाट्यकर्मी व सिने कलाकार दिग्दर्शक व लेखक म्हणून नाट्य व चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे .
दिप सिम्फनीज निर्मित वामन पतके लिखित, व जेष्ठ नाट्यदिग्दर्शक व अभिनेते दिपक घारू यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपट झिजाय याचे नवी दिल्ली येथे दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी स्क्रीनिंग होऊन ‘सिर्टीफिकेट ऑफ एकलन्स’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला  आहे .त्याच बरोबर घारु यांनी अनेक एकांकिका व नाटके दिग्दर्शित करुन त्यात कलाकार म्हणून काम केले असून नाट्यस्पर्धा व एकांकिका स्पर्धेत सह्भाग घेउन बक्षिसे मिळविली आहेत .नाट्य समीक्षक व नाट्य परीक्षक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे . ते उत्कृष्ट चित्रकार ही आहेत . स्टेट बॅक ऑफ इंडियात आधिकारी म्हणन त्यांनी काम केले आहे . त्याच बरोबर सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात ही ते कार्यरत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button