Uncategorized
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या ७८व्या वर्धापनदिन शिरूरमध्ये उत्साहात साजरा





यंदाही शिरूर बसस्थानकात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.वर्धापनदिनानिमित्त बसस्थानक परिसराची स्वच्छता करून आकर्षक सजावट करण्यात आली होती.
रांगोळ्या, फुलांची आरास, तोरणे आणि फुलमाळांनी सजविलेल्या एसटी बसमुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. ज्येष्ठ प्रवाशांच्या हस्ते केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
यानंतर प्रवाशांना पेढे, बर्फी तसेच गुलाबपुष्पांचे वाटप करण्यात आले.
सांगितले की, शिरूर बसस्थानकात २५० हून अधिक कर्मचारी कार्यरत असून दररोज १९३ बसगाड्या विविध मार्गांवर धावतात. तसेच सुमारे ३ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी एसटीच्या सवलतीच्या प्रवास योजनेचा लाभ घेत आहेत. अधिकाधिक नागरिकांनी सुरक्षित, किफायतशीर आणि विश्वासार्ह असलेल्या एसटी सेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


