महाराष्ट्रराष्ट्रीयविशेषस्थानिक
दशक्रिया घाट मार्गावरील अतिक्रमणांवर नगरपरिषदेची कारवाई; अतिक्रमणविरोधी पथकाची स्थापना

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शहरातील सार्वजनिक रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी शिरूर नगरपरिषदेने अतिक्रमणविरोधी मोहिमेला अधिक गती दिली असून, आज १ जून रोजी हलदी मोहल्ल्यातील दशक्रिया घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.


या पथकाचे प्रमुख नगर अभियंता असतील, तर बांधकाम अभियंता सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत.
महिला व पुरुष पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे, कर निरीक्षक माधव गाजरे यांच्यासह शंभरहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.
जेसीबी, ट्रॅक्टर, अग्निशमन वाहन आणि आवश्यक मनुष्यबळाच्या सहाय्याने ही मोहीम राबविण्यात आली.
प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगत मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी अशा मोहिमा पुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनी पुन्हा अतिक्रमण न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.