Uncategorizedमहाराष्ट्र

शिक्षक विजयकुमार शेजवळ यांच्या माजी प्राचार्य डॉ. सोहोनी यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: बाबुरावजी सणस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मंगळवार पेठ, पुणे येथे गेली २३ वर्षे अध्यापन सेवा बजावणारे शिक्षक विजयकुमार मनोहर शेजवळ हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले.

 त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

 शिरूर येथील तिळवण तेली समाजाच्या मुंबई बाजार परिसरातील हनुमान मंदिर येथे हा कार्यक्रम झाला.

समारंभास माजी प्राचार्य डॉ.सदाशिव सोहोनी, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण,माजी नगरसेवक मुन्ना उर्फ आबीद शेख,भाजपाचे माजी शहराध्यक्ष संपत लोखंडे, योगेश जामदार, संदीप कडेकर, शंकरराव भुजबळ विनायक दौडकर, राजेश जगताप गजानन शेजवळ, मुख्याध्यापक वेताळ, बादशहा मण्यार, प्रमोद पवार, गजानन शेजवळ, संजय कडेकर, दीपक शेजवळ, गणपत लोखंडे, गणेश शेजवळ आदी उपस्थित होते.

शिक्षक विजयकुमार शेजवळ यांनी शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण व सामाजिक भान रुजविण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मानपत्र देऊन त्याच्या सन्मान यावेळी करण्यात आला.यावेळी बोलताना विजय शेजवळ म्हणाले की आपल्या जडणघडणीत आई वडिलांचे मोठे योगदान असून शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे काम केले.माजी प्राचार्य सोहोनी म्हणाले की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेजवळ यांचे व्यक्तिमत्व घडले. शेजवळ यांच्या मध्ये शिक्षण घेण्याची प्रचंड उर्मी होती.शेजवळ यांचे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.पुण्यासारख्या शहरात अध्यापनाचे उत्तम काम शेजवळ यांनी केल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपतराव लोखंडे यांनी केले.आभार प्रमोद पवार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button