Uncategorized

परवानगीविना जाहिरात फलक लावणाऱ्या चार बांधकाम विकासक संस्था विरुद्ध गुन्हा

  1. शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}: राज्य महामार्ग क्रमांक १०३ लगत शासनाच्या दिशादर्शक फलकांवर परवानगीशिवाय जाहिरातीचे फलक लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी चार बांधकाम व विकासक संस्थांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी शैलेश दिनकर गाडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. २८ मे रोजी शिरूर हद्दीतील राज्य महामार्ग क्रमांक १०३ वर माषेरे वस्ती ते शिरूर दरम्यान पाहणी करण्यात आली असता शासनामार्फत उभारलेल्या दिशादर्शक फलकांवर कोणतीही पूर्वपरवानगी न घेता खासगी जाहिराती लावण्यात आल्याचे आढळून आले.

याप्रकरणी विविध विकासक संस्थांनी मिळून १५७ जाहिरात फलक लावल्याचे निष्पन्न झाले असून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२४(३), ३२४(४) व ३२४(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार बनकर यांनी फिर्याद नोंदवली असून पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button