Uncategorizedक्राईम
कर्डे घाटात गोळीबार; विशाल काळेचा खून, एक जखमी
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर तालुक्यातील कर्डे घाट परिसरात सोमवारी सायंकाळी भररस्त्यात झालेल्या गोळीबार आणि हल्ल्याच्या थरारक घटनेत विशाल काळे (वय ३०, रा. शिरूर) याचा मृत्यू झाला, तर केदार झाडगे हा जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिरूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.




केदार झाडगे याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शिरूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश जगदाळे हा घटनेच्या वेळी घटनास्थळावरून पळून गेला होता; मात्र तो नंतर पोलिसांसमोर हजर झाला.




