Related Articles
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}वाघ प्रोफेशनल अकॅडमी (WPA) आयोजित WPA Turf Box Cricket Tournament Season 1 ही बॉक्स क्रिकेट स्पर्धा नुकतीच रामलिंग टर्फ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्पर्धेत ४२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
सहभागी खेळाडूंना सहा संघांमध्ये विभागून सामने खेळविण्यात आले.
संघात जैद शेख, मिजान शेख, सार्थक गूगळे, जान्हवी फुले, हार्दिक धाडीवाल आणि प्रज्वल शिर्के यांचा समावेश होता.
स्पर्धेचे उपविजेतेपद ‘थंडर स्ट्रायकर्स’ संघाने मिळविले. या संघात सिद्धेश कोठारी, राघव अफजलपूरकर, तेजस भोसले, सागर बसरकर, अक्षता वाघ, हितेन बोरा आणि सुदर्शन जगदाळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये मयूर परमार यांना ‘सर्वोत्कृष्ट गोलंदाज’ (बेस्ट बॉलर), अनिकेत केळगंद्रे यांना ‘सर्वोत्कृष्ट फलंदाज’ (बेस्ट बॅट्समन) तर मिजान शेख यांना ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल खेळाडू व उपस्थितांनी वाघ प्रोफेशनल अकॅडमीच्या नियोजनाचे आणि व्यवस्थापनाचे कौतुक केले.




