शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शहरातील वार्ड क्रमांक २ मध्ये नगरसेविका स्वप्नाली जामदार मित्र परिवार व कुंभार आळी मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय मोफत बाल संस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा शुभारंभ नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांच्या हस्ते झाला.
शिबिरामध्ये मुलांसाठी श्लोक, प्रार्थना, स्तोत्र पठण, सूर्यनमस्कार, योगासने, कराटे प्रशिक्षण, चित्रकला, हस्ताक्षर सुधारणा, अबॅकस प्रशिक्षण, तबला व पेटी वादन यांसह विविध उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ‘गुड टच-बॅड टच’ विषयावरील जनजागृती, दंत तपासणी आणि नेत्र तपासणी यांसारख्या आरोग्यविषयक उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे.

शिबिराच्या उद्घाटनानंतर आयोजित करण्यात आलेल्या खेळांमध्ये नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे या स्वतः बालगोपाळांमध्ये मिसळून सहभागी झाल्या. मुलांसोबत विविध खेळ खेळताना त्यांनी बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या वतीने मुलांना खाऊचेही वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा पाचर्णे म्हणाल्या, “लहान वयात योग्य संस्कार झाले तरच सक्षम युवा पिढी घडते आणि सक्षम युवा पिढीमुळेच राष्ट्राची प्रगती होते.”
कार्यक्रमात रवींद्र धनक यांनी मुलांसोबत गाणी म्हणत आनंद लुटला. सभापती सुनिता पोटे व आयेशा सय्यद यांनीही मुलांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले. शिबिराच्या प्रत्येक दिवशी कार्यक्रमाच्या शेवटी
मच्छिंद्रजामदार यांच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
मच्छिंद्रजामदार यांच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.शिबिराच्या पहिल्याच दिवशी सुमारे ७० मुलांनी नोंदणी केली असून पालकांकडूनही या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले आहे.
यावेळी सभापती स्वाती साठे, नगरसेविका संगीता मल्लाव, माजी नगरसेविका कालेवरताई, शशिकला काळे, उषा वाखारे, राणी कर्डिले, शितल शर्मा
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली साखरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरसेविका स्वप्नाली जामदार यांनी केले. बालकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असून शिबिराला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केला.








