क्राईम
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}एमआयडीसी पोलिसांनी व दहशतवाद विरोधी शाखेने संयुक्त कारवाई करत रांजणगाव परिसरातील एका लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत सात महिलांची सुटका करण्यात आली असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी लॉजिंग चालक लुतपफर मुज्जमहलक वय -४५ सध्या रा. रांजणगाव मूळ रा. नालीताजल , ता. बाजीतपूर धनियाखाली , जि. हुगली पश्चिम बंगाल, व बबलू साहू रा. कारेगाव मूळ राहणार – उडीसा यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.





