Uncategorizedक्राईम

दोन महिलांसह तीन अल्पवयीन मुले बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांसह तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही प्रकरणांत शिरूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये अपहरणाचे गुन्हे दाखल केले असून, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

रामलिंग, देवाडेवस्ती येथील अनिता सागर धुळे (वय २९) ही महिला ६ सप्टेंबर रोजी सकाळी मुलगा भिमा (वय ४) याला सोबत घेऊन सरकारी दवाखान्यात जाण्याचे सांगून घराबाहेर पडली. मात्र ती व मुलगा परत न आल्याने पती सागर धुळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अनिता हिच्या अंगावर पिवळी साडी व लाल ब्लाउज असून, तिच्यासोबत टेक्नो कंपनीचा मोबाईल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पोहवा आगलावे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत रामलिंग येथील फिजा युनुस दरोगे (वय २३) ही महिला ८ सप्टेंबर रोजी दोन मुलांना सोबत घेऊन ब्लाउज शिवण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतली नाही. तिच्यासोबत आफाज (वय ५) आणि आदिल (वय ३) ही मुलेही बेपत्ता आहेत. युनुस दरोगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहवा खेडकर करीत आहेत.

दोन्ही घटनांमध्ये महिलांसह अल्पवयीन मुले बेपत्ता असल्याने पोलिसांनी विविध शक्यता तपासत शोधमोहीम सुरू केली आहे. बेपत्ता व्यक्तींबाबत कोणाला माहिती मिळाल्यास तातडीने शिरूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button