क्राईम
Check Also
Close
-
बंधबिगारीचा धक्कादायक प्रकार; गुन्हा दाखलJuly 15, 2026
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम कार्ड चलाखीने बदलून त्यांच्या खात्यातून तब्बल ३८ हजार रुपये काढून घेतल्याची घटना शिरूर शहरात घडली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यावेळी एटीएममध्ये असलेल्या ३० ते ३२ वर्षीय अनोळखी व्यक्तीने, “पैसे कट झाले आहेत, स्लिप घेतली नाही; थांबा, मी स्लिप काढून देतो,” असे सांगून त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.

