क्राईम
शिरूर परिसरात एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई; ११० ग्रॅम एमडीसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
दोन आरोपी ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांची संयुक्त कारवाई
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}नशामुक्त भारत अभियान आणि ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून शिरूर परिसरात स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ११० ग्रॅम वजनाचा सुमारे २२ लाख रुपये किमतीचा मेफेड्रोन (एम.डी.) अमली पदार्थ व मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी अमली पदार्थ तसेच तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिरूर परिसरात माहिती संकलन सुरू केले होते.
दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सुरेंद्रसिंह भैरसिंह राठोड ऊर्फ राजपूत (वय २४, रा. मनीष शिरोळे फॉर्म हाऊस, मलठण , ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. गोगादेव की ढाणी, बांकीयावास खुर्द, ता. कल्याणपूर, जि. बाडमेर, राजस्थान) आणि श्रवण तेजाराम बिनोई (वय ३२, रा. मनीष शिरोळे फॉर्म हाऊस, मलठण , ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा.
बांकीयावास खुर्द, ता. कल्याणपूर, जि. बाडमेर, राजस्थान) हे शिरूर परिसरात एम.डी. अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ११० ग्रॅम वजनाचा एम.डी. अमली पदार्थ तसेच मोटारसायकल असा एकूण सुमारे २२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७४४/२०२६, एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, पुणे विभाग आणि शिरूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूर पोलीस ठाण्याचे पो
लीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक नितीन केनेकर, पोलीस हवालदार गोविंद खटींग, तसेच पोलीस अंमलदार संजय पडयाळ, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील, सागर धुमाळ, चेतन पाटील आणि शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संदीप खेडकर, रवी काळे, तोसरे यांनी सहभाग घेतला.

