राजकीयस्थानिक

शिरूर बाजार समिती निवडणुकीत चुरस; १८ जागांसाठी तब्बल ३०० उमेदवारी अर्ज

शिरूर : तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मोठी उत्सुकता निर्माण झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी एकूण ३०० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत चुरशीची लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

यंदाच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, सहकारी क्षेत्रातील पदाधिकारी, विद्यमान व माजी संचालक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींनी उमेदवारी दाखल केली आहे. प्रमुख उमेदवारांमध्ये जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, प्रफुल्ल शिवले, बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, शंकर जांभळकर, प्रकाश पवार, नगरसेवक संतोष थेऊरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, माजी संचालक धैर्यशील मांढरे, संतोष मोरे,विश्वास ढमढेरे, राजेंद्र जासूद, सावित्रा थोरात, राजेंद्र नरवडे, संजय बाफना, संतोष भंडारी, मनसेचे संदीप कडेकर, सामाजिक कार्यकर्ते संजय पाचंगे त्याच बरोबर जगदीश पाचर्णे,बापूसाहेब शिंदे, अनिल काशीद यांचा समावेश आहे.

बाजार समितीच्या विविध मतदारसंघांमध्ये सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण, इतर मागास वर्ग, महिला राखीव, विमुक्त जाती-भटक्या जमाती, व्यापारी-आडते, ग्रामपंचायत सर्वसाधारण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच हमाल-मापाडी मतदारसंघातून मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत.

विशेष म्हणजे सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघात सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या गटातील निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे. ग्रामपंचायत आणि व्यापारी-आडते मतदारसंघातही अनेक दिग्गजांनी उमेदवारी दाखल केल्याने राजकीय समीकरणांना वेग आला आहे.

दरम्यान, निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्रितपणे लढणार की स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच भाजप, मनसे, इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांची भूमिका काय राहणार यावरही निवडणुकीची दिशा ठरणार आहे.

उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी स्पष्ट होणार असून त्यानंतरच बाजार समिती निवडणुकीचे खरे राजकीय चित्र समोर येणार आहे. सध्या तरी मोठ्या संख्येने दाखल झालेल्या अर्जांमुळे शिरूरच्या राजकीय व सहकारी क्षेत्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

मतदारसंघ निहाय उमेदवार पुढीलप्रमाणे –

सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण-सुरेश हरगुडे, रविंद काळे, अनिल रुके, बाबाजी निचित, राजेंद नरवडे, संतोष शिंदे,धैर्यशील मांढरे,शिवाजी वडघुले, राजेंद्र जगदाळे, बबन वाळके, हनुमंत शिवले,अनिल नवले,एकनाथ शेलार,भानुदास भोसुरे,सावित्रा थोरात,राजेंद्र गायकवाड ,विश्वास ढमढेरे,शेखर डाळींबकर,हनुमंत काळे ,समीर कोरेकेर, अनिल काशीद, अशोक माशेरे, सुजित पवार,प्रकाश पवार नवनाथ हरगुडे,सुरेश बेंद्रे,संतोष ढमढेरे,संदीप गायकवाड,मिंडे निलेश,ज्ञानेश्वर थेऊरकर,संपत ढमढेरे,किरण ढोकले,नानाभाऊ फुलसुंदर,योगेश ढमढेरे,राहुल गवारी,राक्षे बापू, बापूसाहेब शिंदे,रमेश तांबे,अजित दरेकर,गणेश दरेकर,शिवाजी ओव्हाळ ,रमेश धुमाळ,शशिकांत द्सगुडे संभाजी बेनके,सचिन मचाले,जगदीश पाचर्णे, संतोष वर्पे,सुरेशचंद्र ढवळे, विकास गायकवाड,संतोष मोरे,रोहित खैरे,अक्षय फलके,विकास जगताप पांडूरंग पाचर्णे,अरुण गोरडे, संतोष लंघे, गणेश रोडे,सोपान गवारी,संभाजी फराटे,रविंद्र दोरगे,श्रीनिवास घाडगे, शिवाजी घोलप, संजय पाचंगे,अशोक दाते, विठ्ठल चौधरी ,अशोक गारगोटे,सुभाष कांडगे,राहुल रणदिवे,प्रकाश पवार, प्रमोद प-हाड,सुहास मलगुंडे,नामदेव जाधव,सागर दंडवते,रामचंद्र नागवडे,गौरव करंजे, विजय ढमढेरे,सुरेश पलांडे,दत्तात्रेय कदम,स्वप्नील गायकवाड,राजेंद्र गावडे, विरेद्र शेलार,विजय भोस, गोविंद फराटे,नारायण फडतरे,अनिल भुजबळ,विजय भुजबळ,शामकांत काळे,दत्तात्रेय हरगुडे,संपत पानमंद, भाऊसाहेब पाचंगे, केशव पाचर्णे, बाळू पठारे, मेष फंड, सुजित पवार, राहुल पवार, राहुल करपे,अनिल द्सगुडे, मुकुंद नरवडे, अजित पवार, दतात्रेय नरवडे, सुदाम तळोले, भाऊसाहेब लंघे,शंकर जांभळकर, विश्वास ढमढेरे,राजेंद्र जासूद, अंकुश शिवले, प्रफुल्ल शिवले,कुंडलिक शितोळे, सागर फराटे,नवनाथ हरगुडे,कांतीलाल फडतरे, राजेंद्र गदादे राजेश लांडे, कमलाकर साठे, उध्द्व शेलार,शामकांत काळे, संतोष थेऊरकर, जयेश शिंदे,आबासो जाधव,नितीन थोरात, शिवाजी घोडे,संतोष भोसले,समीर धुमाळ

सेवा सहकारी इतर मागास वर्ग मतदार संघ उमेदवार अर्ज —

सुरेश हरगुडे,नवनाथ फरगडे, संदीप गायकवाड,संतोष शिंदे, शिवाजी वडघुले,एकनाथ शेलार, हनुमंत काळे,आनंदराव हरगुडे, पोपटराव भुजबळ,नानाभाऊ फुलसुंदर,कविता पाटोळे,विकास गायकवाड, संतोष मोरे, संभाजी कर्डिले, गणेश रोडे, संतोष लंघे,रोहित खैरे, किरण ढोकले,बाळासाहेब टेमगिरे, विनोद चौधरी, अरुणकुमार मोटे, रविंद्र दोरगे,सागर दंडवते,नामदेव जाधव,अनिल भुजबळ , निलेश थोरात,विजय भुजबळ, देविदास भोर, प्रफुल्ल शिवले,विकास शिवले, नवनाथ हरगुडे,राजेंद्र गदादे,राजेश लांडे, ज्ञानेश्वर थेऊरकर

सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदारसंघ उमेदवार अर्ज – सुजाता नरवडे,उज्वला शेलार,कविता जगदाळे,नयन ढमढेरे,प्रतिभा नागवडे,कविता पाटोळे, छायाताई बेनके,शशिकला फुलसुंदर, चेतना ढमढेरे, सुनीता रणदिवे, मंगल लंघे,सविता जगताप,आशा हिंगे, सविता प-हाड, राजश्री फराटे, पल्लवी रणदिवे, संगीता लांडे,अंजली शिवले, पुष्पा दरेकर, साठे संगीता, अलका कदम, संगीता वाळके,उर्मिला फलके,

सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघ उमेदवार अर्ज –

डॉ. हेमंत पवार,शांताराम उचाळे ,गोरखनाथ तांबे,लोखंडे उत्तम,बिरदेव शेंडगे, सतीश कोळपे,सुहास मलगुंडे,लोखंडे संभाजी, गंगाराम शिंदे, कुष्णा माने, राजेंद्र गावडे, सुभाष गव्हाणे,कैलास कोकरे,शरद पवार, सुभाष पोकळे,शिवाजी घोडे, विजेंद्र गद्रे, महादेव जाधव, राजेंद्र गायकवाड,नितीन पाटोळे,सतीश सोनवणे, बाळासाहेब जाधव,उत्तम सोनवणे, वैष्णव इसवे,उत्तम कदम,विशाल आल्हाट व्यापारी आडते मतदार संघ – संदीप कडेकर, सुदीप गुंदेचा, अजय गांधी,सुनील कांतीलाल बाफना,आरिफ पठाण,संतोष भंडारी,अनुप भंडारी,गणेश गावडे,धनंजय भुजबळ,अजित ओस्तवाल,मयूर ओस्तवाल,संदीप द्सगुडे, नारायण भोसले,बाळासाहेब टेमगिरे, शैलेन्द्र मांढरे,संतोषकुमार भटेवरा, दिलीप रुणवाल,सचिन गुंदेचा , सचिन ढमढेरे,

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ उमेदवार अर्ज – अजित रणदिवे,शेखर डाळींबकर ,धैर्यशील मांढरे,मल्हारी काळे,जगदीश पाचर्णे,बाबाजी निचित,शशिकांत दसगुडे, राजेंद्र दसगुडे, अशोक गावडे,संतोष मोरे,श्रीराम शेलार, बाबाजी वर्पे, नामदेव जाधव,सागर दंडवते, प्रमोद प-हाड, अमोल शितोळे,विलास कर्डिले, अभिजित जगताप, नानासाहेब साबळे, मुकुंद नरवडे, राजेंद्र गावडे, गणेश कर्डिले, सागर फराटे,अनिकेत दसगुडे, बापूसाहेब शिंदे, केशव शिंदे, देविदास भोर, राहुल जगताप संतोष थेऊरकर , नवनाथ हरगुडे, संतोष शिंदे, संतोष ढमढेरे, शामकांत काळे,

ग्रामपंचायत आर्थिक द्रष्ट्या दुर्बल मतदार संघ उमेदवार –अजित रणदिवे, संभाजी कर्डिले, आशा पाचर्णे,गणेश रोडे,किरण ढोकले,रोहित खैरे, अमोल शितोळे,खिवराज फिरोदिया,सुदाम तळोले,किरण झंझाड, नामदेव जाधव ज्ञानेश्वर थेऊरकर,विजय ढमढेरे, संतोष दौडकर ,संतोष शिंदे, शेखर डाळिंबकर

हमाली मापाडी मतदार संघ उमेदवार –

निलेश द्सगुडे , बंडू जाधव, बाळासाहेब कर्डिले, मुक्ता गुलदुगड

दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवणार कि स्वतंत्र व भाजपा व अन्य पक्ष व अपक्ष काय भूमिका घेतात यावर पुढील निवडणुकीची समीकरणे ठरणार आहेत. उमेदवार माघारी नंतर हे सर्व चित्र स्प स्पष्ट होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button