Uncategorizedस्थानिक
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24} संतोष भाऊसाहेब शेवाळे (वय ३६) यांच्यावर मेंदूमध्ये पाच सेंटीमीटरची गाठ आढळल्यानंतर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात येत असून, त्यांच्या उपचारासाठी नागरिकांनी आर्थिक मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, ही गाठ कर्करोगाची नसल्याने उपचार यशस्वी होण्याची आणि संतोष पूर्णपणे बरे होण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे.





