Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर नगरपरिषदेने मार्च २०२६ अखेर घरपट्टी करापोटी ६ कोटी ३६ लाख ८४ हजार रुपयांची वसुली केली असून, ही रक्कम निर्धारित उद्दिष्टाच्या ५७.१७ टक्के इतकी आहे.
दरम्यान, थकबाकीदारांसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेचा २४४ मालमत्ताधारकांनी लाभ घेतला असून, त्यांना मिळून २४ लाख ५९ हजार १७१ रुपयांच्या दंड व व्याजाची माफी देण्यात आली.



