शिरूरमध्ये मंगळवारी २८ जुलैला भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर
शिरूर{डेली न्यूज पोस्ट टीम 24}): दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, २८ जुलै रोजी शिरूर येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत शिरूर नगरपरिषदेच्या जुने मंगल कार्यालय, बसस्थानकाजवळ येथे होणार आहे. या उपक्रमाचे आयोजन बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग
यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.शिबिरामध्ये नागरिकांची विविध आजारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून
आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनही दिले जाणार आहे. यासोबतच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने इच्छुक नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शिरूर व परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा आणि अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनो केले आहे.