Uncategorizedमहाराष्ट्र

शिरूरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा स्थापन करण्याच्या हालचाली; ३० ऑगस्टला कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम, २४}: शिरूर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची (अंनिस) शाखा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने रविवारी जीवन विकास मंदिर येथे आढावा बैठक उत्साहात पार पडली. लोकजागृतीचे संघटक रवींद्र धनक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील डॉक्टर, वकील, नगरसेवक, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

बैठकीत शिरूर शाखा स्थापन करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी, सदस्य नोंदणी, क्रियाशील व हितचिंतक सभासदांची भूमिका तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यपद्धतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रभर अंनिसच्या सुमारे ३०० शाखा कार्यरत असून संस्थेची चतु:सूत्री, उद्दिष्टे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व याविषयी अंनिसच्या पदाधिकारी नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, रवींद्र धनक, डॉ. क्रांती पैठणकर आणि डॉ. वैशाली साखरे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शिरूर शाखेच्या स्थापनेची पूर्वतयारी म्हणून येत्या ३० ऑगस्ट २०२६ रोजी एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या शिबिरात वैज्ञानिक दृष्टिकोन, चमत्कारांचे प्रयोग, भूत-भानामती, संविधानाचा जागर तसेच मन आणि मानसिक आजार अशा विविध विषयांवर तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने आणि प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिरूर शाखेचे सदस्यत्व घेण्याची किंवा समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी डॉ. क्रांती पैठणकर  ८३२९१८७९९१व डॉ. वैशाली साखरे   98812 56897   यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस रवींद्र धनक, शिरूर नगरपरिषदेच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, उपसभापती आयेशा सय्यद, डॉ. क्रांती पैठणकर, डॉ. वैशाली साखरे, शीतल शर्मा, वैशाली चव्हाण, सविता बोरुडे, प्रीती बनसोडे, सुमेधन्यवाद डोंगरे, ललिता पोळ, गणेश गोरखे, अविनाश शिंदे, पृथ्वीराज तराळ, अर्णव बेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button