शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}येथील जुन्या पिढीतील राज्य परिवहन महामंडळ { एस. टी.) मधील सेवानिवृत्त आधिकारी विजयकुमार नारायण पिल्ले वय ९१ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
एस टी मध्ये अधिकारी म्हणून काम करीत असताना पुण्यासह राज्यातील विविध शहरात त्यांनी काम केले. कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी अशी त्याची ओळख होती . त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
एस टी मधील सेवानिवृत्त अधिकारी राजू पिल्ले व धर्मगुरु चंद्रहास पिल्ले, मधुलिका बबन गायकवाड, सारिका छछलाणी यांचे ते वडील होत.
अंत्ययात्रा आज मंगळवार दिनांक २८ जुलै २०२६ रोजी लाटेआळी येथील राहत्या घरापासून ख्रिस्त दफनभूमी रामलिंग रोड शिरूर येथे जाईल.