निधन वृत्त

आदर्श शिक्षिका मीनाक्षी स्वामी नायडू यांचे निधन शिरूरच्या विद्याधाम प्रशालेतील विद्यार्थीप्रिय शिक्षिकेला भावपूर्ण श्रद्धांजली

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}येथील विद्याधाम प्रशालेतील आदर्श शिक्षिका मीनाक्षी अनंत स्वामी नायडू (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. विद्यार्थीप्रिय आणि शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून त्यांची विशेष ओळख होती. अवघड विषयही सोप्या भाषेत समजावून सांगण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्याविषयी आदराचे स्थान होते. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार

सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता कोथरूड येथील उंबरे पार्क, शांतीबन अपार्टमेंटमधील त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघेल. दुपारी १ वाजता पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती हेमंत नायडू यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button