Uncategorized

गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती कितीही मोठी असली, तरी तिच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपअधीक्षक रवींद्र भोसले यांनी दिला.
शिरूर परिसरात अलीकडच्या काळात गोळीबार, चोरी, मारामारीसह विविध गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक भोसले यांनी बातमीदारांशी संवाद साधला. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येणार आहे. अनधिकृत टपऱ्या हटविणे, रात्रीची गस्त अधिक प्रभावी करणे आणि ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित करणे, अशा उपाययोजनाही करण्यात येणार असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.



