राष्ट्रीयविशेषसांस्कृतिक
शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी समाजाने पुढे यावे : प्रवीण तरडे
मुळशी पॅटर्न १’च्या कामाला पुढील आठवड्यात सुरुवात; शिरूरमध्ये ‘देऊळ बंद भाग 2’ निमित्त संवाद
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शेतकरी आत्महत्या हा केवळ सरकार किंवा प्रशासनाचा विषय नसून तो आपल्या प्रत्येकाच्या घरातील प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी समाजाने एकत्र येत संवेदनशीलतेने पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन अभिनेते व निर्माता प्रवीण तरडे यांनी केले.
पुढील आठवड्यापासून ‘मुळशी पॅटर्न १’ या चित्रपटाच्या कामाला सुरुवात करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
सध्या प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद भाग १’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रवीण तरडे व चित्रपटातील सहकारी कलाकार रमेश परदेशी, केदार सोमण, अतुल कुडले, वैभव आगाव, सुनील पालकर, सागर पाठक शिरूर येथील बाबुराव नगरमधील डीजे गोल्ड चित्रपटगृहाला भेट दिली.
यावेळी प्रेक्षकांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. कार्यक्रमास डी जी गोल्ड शिरूरचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड, ॲड .सागर गायकवाड, ॲड .बाबुराव पाचंगे, रवि लेंडे , सुशांत तायडे आदी उपस्थित होते.
प्रवीण तरडे म्हणाले, “हार, तुरे, शाल आणि बुके यांची परंपरा आता बंद करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. काहींना पाहुण्यांसाठी नारळ घेणेही परवडत नाही. त्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो.”
“एका बुकेसाठी किंवा शालीसाठी खर्च होणारे ३०० रुपये एखाद्या गरजू कुटुंबासाठी मोठी मदत ठरू शकतात. दिखाव्यावर खर्च करण्याऐवजी माणसांशी संवाद वाढविणे महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.






